Song Link: https://youtu.be/75f_xko1KbQ

कोविड -१९ च्या कारणास्तव सरकारने देशव्यापी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविल्यामुळे, बैजू मंगेशकर यांनी संगीतकार शिवंश कपिल यांच्याबरोबर व्हर्चुअल संगीत कोलॅब्रेशनची रचना केली.
बैजू म्हणाले “हे कोविड -१९ #स्टेहोम #लॉकडाउन च्या समर्थनात एक नफारहीत असे पहिले पाऊल आहे. हे केवळ प्रयोगात्मक सहकार्य नाही पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिपूर्णतेसह व्यावसायिकपणे रचलेले संगीत आहे. ”
काही मराठी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांनाही बैजूने यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांचा हा संगीत विडिओ त्यांच्यासाठी समर्पित आहे जे इतरांसाठी आपला जीव धोक्यात घालत आज आपली कामगिरी बजावत आहेत. "आम्ही आशा करतो की हे प्रत्येकास त्यांचे व्यक्तिगत काम सुरू ठेवण्यास प्रवृत्त करेल आणि हाती आलेल्या या वेळेचा सकारात्मक वापर करतील. " बैजू म्हणाले.
पुनःरचनेसाठी इंग्रजी गाण्याची निवड का केली? हा प्रश्न विचारल्यास बैजू मंगेशकर म्हणाले, "ही जागतिक महामारी आहे आणि इंग्रजी भाषा आज कमी-अधिक प्रमाणात वैश्विक भाषा आहे. ही लढाई जिंकण्यासाठी जगाने एकत्र येण्याची गरज आहे. मी लहानचा मोठा होत असताना जागतिक संगीतासह हिंदुस्थानी संगीतदेखील माझ्या संवेदनांना नवे आकार देत होते. मला हे विशिष्ट गाणे आवडते आणि याचे मार्मिक शब्द या कठीण काळात आपण सर्वाना अनुनाद करतील."
ए आर रहमान अकादमीतील एक प्रतिभावान तरुण संगीतकार, शिवांश कपिल याचे हिंदुस्थानी शास्त्रीय तसेच पाश्चात्य संगीतातही प्रशिक्षण आहे. ते पियानोवादक आणि संगीत व्यवस्थापन करतात. त्यांनी दक्षिण व मराठी चित्रपटातील अनेक प्रकल्पांवर काम केले आहे आणि सध्या तो बॉलिवूडच्या प्रकल्पामध्ये व्यस्त आहे.
बैजू मंगेशकर हे भारतरत्न लता मंगेशकर यांचे पुतणे आणि पदमश्री हृदयनाथ मंगेशकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा शेवटचा अल्बम 'या रब्बा' हा सुफियाना शैलीतील होता. ह्या अल्बम मधील गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध हि केले आणि गान-कोकिळा लता मंगेशकर सोबत गायिली आहेत.
No comments:
Post a Comment