Wednesday 29 January 2020

ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या हस्ते रिवा राठोड यांच्या पहिल्या सोलो अल्बम 'साया तेरे इश्क का' चे अनावरण



मंगळवार, दिनांक २१ जानेवारीला मुंबईच्या प्रख्यात पाचतारांकित हॉटेल सहारा स्टार मध्ये रिवा राठोड या प्रतिभावान गायिकेच्या पहिल्या सोलो अल्बमचे अनावरण लेजेंडरी गीतकार गुलजार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गुलजार आणि रीवा राठोड, रूपकुमार राठोड, सुनाली राठोड यांच्याव्यतिरिक्त  टाइम्स म्युझिकच्या गौरी यादवाडकर, डार्विन प्लॅटफॉर्म चे चेयरमन आणि मॅनॅगिंग डायरेक्टर अजय हरिनाथ सिंह, व्हिडिओ डायरेक्टर मधुर श्रॉफ, संगीतकार कल्याण बरुआह आणि फिल्ममेकर  अनुशा श्रीनिवासन अय्यर यांनी या भव्य आयोजित म्युजिक लाँचला आपली उपस्थिती लावली.

 २०१८ सालचे गुलज़ार वैशिष्ट्यीकृत 'मौला' (वन अबाव)  आणि साल २०१९ मधले 'सांवल' ज्याचे संगीत निर्माता होते जाकीर हुसेन आणि मायकल मेननर्ट  याच्या समीक्षात्मक गाजलेल्या हिट्ससाठी प्रसिद्ध गायिका - संगीतकार- पिनिस्ट रिवा राठोड पुन्हा एकदा त्यांच्या फॅन्सच्या मनावर राज्य करायला सज्ज  आहेत. त्यांच्या नवीन पहिल्या सोलो अल्बम सोबत ज्याचे शीर्षक आहे 'साया तेरे इश्क का'. मुख्य बाब म्हणजे ह्या अल्बमची गाणी स्वतः गुलज़ार यांनी लिहिली आहेत! रीवा ह्या समयी गुलजार बद्दल आभार व्यक्त करत म्हणाल्या, "गुलजार साहेबांनी मला माझ्या हृदयाचे अनुसरण करणे, स्वतः वर विश्वास करणे शिकवले आणि 'साया तेरे इश्क का' सह माझे सर्व भय दूर करण्यास मी शिकले."

स्वर्गीय पंडित चतुर्भुज राठोड आजोबा म्हणून, रूपकुमार राठोड -सुनाली राठोड माता -पिता म्हणून, आणि संगीत दिग्दर्शक श्रावण राठोड (नदीम-श्रावणातील) काका म्हणून, पाहिले गेले तर असे म्हणण्यात हरकत नाही कि, राठोड घराण्यात  संगीत नसा -नसातून वाहते. रीवा राठोड यांनी मिस शांती सेल्डन अंतर्गत वयाच्या ६ व्या वर्षीपासूनच पाश्चात्य शास्त्रीय पियानो प्रशिक्षण घेतले व त्यानंतर कर्नाटक शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण प्रख्यात गुरु टी.एस. बालामणी  यांच्याकडून घेतले. तिने हिंदुस्थानी शास्त्रीय गाण्याचे प्रशिक्षण बनारस घराना यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित राजन आणि साजन मिश्रा यांच्याकडून घेतले. पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि तिचे वडील रूपकुमार राठोड यांच्या अंतर्गत तीने संगीताची बारकावे शिकले.

आपल्या मुलीबद्दल अभिमान बाळगणाऱ्या आई-वडील रूपकुमार राठोड आणि सुनाली राठोड यांना त्यांचा उत्साह मावेनासा झालाय, “आमच्या लहान परी रिवाचा पहिला सोलो अल्बम लिविंग लेजेंड असे व्यक्तिमत्व गुलजार साहब यांनी लिहिलेला आहे हे जाणून आम्हाला धन्य वाटत आहे,” रुपकुमार राठोड पुढे म्हणाले,  “ती आपल्या गाण्यांकडे जे लक्ष आणि निष्ठा देत आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आतापर्यंत तिने जे काही मिळवले त्याबद्दल मी खूप खुश आहे. यावेळी तिच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी आहे कारण गुलजार साहेबांचे नाव अल्बममध्ये सामील आहे आणि मला खात्री आहे की ती ती यशस्वीरीत्या पार पाडण्यात सक्षम होईल. "

'साया तेरे इश्क का' हे  शीर्षक गीत अमेरिकन निर्माता-इंजिनियर -मिक्सर ब्रायन मालॉफ यांनी मिक्सिन्ग केलेली सॅनिटमय कलाकृती आहे. यापूर्वी ह्या प्रतिभावान परदेशी कलाकारानी मायकेल जॅक्सन, क्वीन, मॅडोना, पर्ल जाम आणि स्टीव्ह वंडर या आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम केले आहे. रिवा यांच्या ह्या अल्बम चे शीर्षक गीत पारंपारिक जाझ आणि आधुनिक पॉपच्या सुंदर धुनात मिश्रित असे हे संयोजन आहे. डीजे रवीनने सुद्धा या अल्बममध्ये ट्रॅक मिसळला आहे. ब्रायन आणि डीजे रविन व्यतिरिक्त कल्याण बरुआह आणि ध्रुव घाणेकर यांच्यासारख्या प्रशंसनीय संगीतकारांनीही या अल्बमच्या निर्मितीत मोठे योगदान दिले आहे.

" ‘साया तेरे इश्क का’ म्हणजे माझ्यासाठी खूप खास आहे. कारण यामुळे माझी मला पुन्हा एकदा नव्याने ओळख झाली. याचे संगीत थेट हृदयातून आहे आणि मी ते शक्य तितके मूळ स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मी माझ्या उर्जेची प्रत्येक स्रोत त्यात घातली आहे, आणि कोणत्याही कृत्रिम युक्तीपासून दूर ठेवले आहे. गुलजार साहेब यांचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे. या संपूर्ण प्रकल्पामागील ते माझा कणा आणि शक्ती होते आणि आहेत, ” रिवा शेवटी म्हणाली.

No comments:

Post a Comment